वाघुरच्या नदीपात्रात बुडाल्याने खिर्डीच्या तरुणाचा मृत्यू
नशिराबाद- वाघूर नदीपात्रात गेलेल्या इसमाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. कृष्णा श्रीराम श्रीपाटी (28, खिर्डी) असे मयत तरुणाचे नाव आहे. श्रीपाटी हा तरुण कुटुंबियांना दुपारी चार वाजता नदीपात्रात अंघोळीला जात असल्याचे सांगून निघाला मात्र घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिस पाटील संतोष शांताराम कोळी यांनी नशिराबाद पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक गुलाब माळी करीत आहेत.