भुसावळ वॉकेथॉनमध्ये धावले 350 स्पर्धक
भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्उ रनर्स असोसिएशन आणि सिल्व्हर लाईन स्पोर्टस् अकॅडमीतर्फे शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. त्यात शहरातील 350 नागरीक सहभागी झाले. त्यात तब्बल 250 महिलांचा समावेश होता. विशेष म्हणजे 3 ते 10 वर्षे वयोगटातील बालकांनीही पाच किलोमीटर अंतर चालण्याचा टप्पा पूर्ण केला. रविवारी सकाळी 6:45 वाजता वॉकेथॉनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सुरुवात झाली. प्रवीण फालक व डॉ. तुषार पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवली.
रम्य सकाळी धावले भुसावळकर
डॉ.आंबेडकर मैदानावरून सुरुवात झाल्यानंतर शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेर रोड मार्गे हॉटेल हेवन व तेथून पुन्हा डॉ. आंबेडकर मैदानावर समारोप झाला. पहाटे 6.45 वाजता सुरू झालेली वॉकेथॉन पाच किमी अंतर कापून 07.55 वाजता समाप्त झाली.
वॉकेथॉनमध्ये अवघ्या तीन वर्षांची चिमुकली आस्था पाटील, संस्कार पाटील, विनीत पाटील, टिना अटवाल व कशिश अटवाल यांनी सहभाग घेतला. या लहानग्यांनी पाच किमी अंतर चालून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
यांनी घेतले स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम
अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या. वॉकेथॉनचे आयोजन दीपेशकुमार सोनार व प्रवीण पाटील यांनी केले. याप्रसंगी स्टेशन संचालक जी.आर. अय्यर, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉ.प्रियंका अय्यर, नरवीरसिंग रावल, पत्रकार श्रीकांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. वॉकेथॉनसाठी डॉ.चारुलता पाटील, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, सचिन अग्रवाल, अंकित पोद्दार, निलेश लाहोटी, अमित अग्रवाल, मीना नेरकर, डॉ.निर्मल बलके, सुनील सोनगिरे, अखिलेश कनोजिया, प्रमोद कुमार शुक्ला, सचिन मनवानी, शुभम मंडलिक, अक्षय वाकोडे, बिट्टू कुमार, चारुलता अजय पाटील, अलका भटकर, डॉ.संजय नेहेते, विलास पाटील इत्यादी सदस्यांनी परीश्रम घेतले.