धुळ्यातील तिघांना गंडा घालणार्‍या सराफाला अखेर बेड्या


पोलिसांना पाहताच सराफाचा दिवट्या पसार : 38 लाखांचे गंडा प्रकरण

धुळे : 38 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी प्रिया ज्वेलर्समधील सराफा विजय मोतीराम ढलाणी यास पोलिसांनी अटक केली असून आरोपीचा दिवट्या भावेश ढलाणी मात्र पोलिसांना पाहताच पसार झाला. दोघा आरोपंनी विशाल मनोहरलाल तोलाणी (कुमारनगर साक्री रोड, धुळे) यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांकडून 431 ग्रॅम जुने सोने घेवुन व अधिक सोने खरेदीसाठी रोख 25 लाख 82 हजार रुपये घेऊन एकुण 38 लाख 75 हजार रुपयांचा अपहार करीत 28 फेब्रुवारी रोजी धुळ्यातून पळ काढला होता तर फसवणूक प्रकरणी विशाल तोलाणी यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भिलाई शहरातील शांती नगर भागातून विजय ढलाणी यास अटक केली मात्र त्याचा मुलगा भावेश ढलाणी हा पसार झाला.


कॉपी करू नका.