जळगावात मानसिक तणावातून तरुणीची आत्महत्या

जळगाव- मानसिक तणावातून धनश्री पंकज वसाणे (26, रा.आशाबाबा नगर, जळगाव) या विधवा तरुणीने धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजता आशा बाबानगरावळ ही घटना घडली. दोन वर्षांपूर्वी तरुणीच्या पतीचे निधन झाल्याने ती वडिलांकडे राहत होती तर दोन महिन्यांपूर्वी देखील या तरुणीने घर सोडले मात्र दुसर्या दिवशी ती घरी परतली होती. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला तर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.




