धुळ्यात एटीएम कार्ड बदलून भामट्याने घातला दिड लाखांचा गंडा


धुळे : एटीएम कार्ड बदलून भामट्याने चक्क एकाला एक लाख 57 हजार 200 रुपयांचा गंडा घातला. शहर पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिल परिसरातील धनाई-पुनाई कॉलनीमधील रहिवाशी असलेले कोमलसिंग रामसिंग पवार (56) हे जिल्हा परीषदेसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये आले कार्ड व पासवर्ड टाकूनही पैसे न आल्याने एका तरुणाने मदतीचा आव आणून पवार यांचे कार्ड बदलले. पवार यांच्या एटीएम कार्डचा इतर ठिकाणी वापर करुन संबंधिताने तब्बल एक लाख 57 हजार 200 रुपये परस्पर काढले.


कॉपी करू नका.