पोलिस अधीक्षकांवर फेकलेला भाला अंगावर घेत त्यांनी वाचवले प्राण


नांदेड : पोलिस अधीक्षकांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षक असलेल्या दिनेश पांडे यांनी आपल्या पाठीवर घेत त्यांचे प्राण वाचविले.नांदेडातील सचखंड गुरुद्वारा येथून हल्ला बोल मिरवणुकीत ही घटना घडली. लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानंतरही 29 मार्च रोजी सायंकाळी गुरुद्वारात अरदास झाल्यानंतर बॅरीकेट तोडून मिरवणूक मुख्य रस्त्यावर आली. यावेळी हातात उघडी शस्त्रे घेवून चारशे ते पाचशे तरुणांचा जत्था पोलिसांच्या दिशेने धावला व पोलिसांवर हल्ला करण्यात आला. प्रवेशद्वार क्रमांक एकवर पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे त्यांचा अंगरक्षक दिनेश रामेश्वर पांडे आणि पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर हे थांबून होते. जमावातील एकाने पोलिस अधीक्षकांच्या दिशेने भाला फेकला व तो भाला पांडे यांच्या पाठीत घुसला. मोठ्या पात्याचा भाला पांडे यांच्या बरगडीपर्यंत पोहचला होता. रक्तबंबाळ होत पांडे जमीनीवर कोसळले. लगेच सहकारी पोलिसांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्या पाठीवर तब्बल पन्नास टाके मारण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !