बोदवडमध्ये फिरत्या लोकअदालतीत सहा प्रकरणात तडजोड
बोदवड : दिवाणी व फौजदारी न्यायालयात बुधवारी दुपारी दोन वाजता फिरत्या लोक अदालतीचे आयोजन तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश एस.डी. गरड यांनी केले. तडजोडीसाठी आलेल्या 26 प्रकरणांपैकी फौजदारी चार व दिवाणी दोन प्रकरणांमध्ये तडजोड होवून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली. बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अर्जुन टी.पाटील अध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक मलचे, पंच अॅड.अर्जुन पाटील, अॅड.के.एस.इंगळे उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
अॅड.शारदा राऊत व अॅड.अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अॅड.के.एस.ंगळे यांनी केले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी
अॅड.मोझे, अॅड.आय.डी.पाटील, अॅड. चंद्रसिंग पाटील, अॅड.विकास शर्मा, अॅड. शारदा राऊत, अॅड.तेजस्विनी काटकर, अॅड.निलेश लढे, अॅड.अमोलसिंग पाटील आदींनी सहकार्य केले.