प्रेमात अडथळा अन् मातेने केली पाच वर्षाय चिमुकलीची हत्या


नवी दिल्ली : प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीची तिच्याच आईने हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची संतापजनक घटनाउत्तर प्रदेशच्या रायबरेलीत समोर आली आहे. आरोपी महिलेचं लग्न बलभद्रपूर गावातील संतोष कुमारसोबत झालं होतं त्यांना एक पाच वर्षांची मुलगीही होती. या मुलीला घेऊन महिला होळीआधी माहेरी गेली होती. ती 31 मार्चला पुन्हा सासरी परत येणार होती. पण ती आली नाही. नंतर सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला. पण काही पत्ता लागला नाही. महिलेच्या सासरच्या लोकांना कुणीतरी सांगितले की, ती दिबियापूर गावातील तिच्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत आहे. जेव्हा ती पुन्हा सासरी परतली तेव्हा तिच्यासोबत मुलगी नव्हती. नंतर सासरच्या लोकांनी मुलीचा शोध घेत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जेव्हा शोध सुरू केला तेव्हा मुलीचा मृतदेह बलभद्रपूर गावापासून 500 मीटर दूर विहिरीत सापडला. पोलिसांनी मुलीच्या आईची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, तिचं वर्षभरापासून एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ती दोन दिवसांपासून त्याच्यासोबत राहत होती. त्यासोबतच आरोपी महिलेने सांगितले की, तिची पाच वर्षांची मुलगी वडिलांना माझ्या प्रेम प्रकरणाबाबत सांगण्याबाबत बोलत होती. त्यामुळे मी माझ्या प्रियकरासोबत मिळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. जेणेकरून आमच्या प्रेम प्रकरणाबाबत कुणाला काही कळू नये.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !