मुक्ताईनगर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटावी
जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील यांची माहिती
मुक्ताईनगर : आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्र लढत असून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा काँगे्रस पक्षाला मिळावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समविचारी पक्षांना घेऊन जेव्हाही आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा मुक्ताईनगर विधानसभेची जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. सलग सहा वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान लढवली परंतु यश मिळाले नाही आहे. आता मात्र मुक्ताईनगर विधानसभेची जागा काँग्रेसला मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या जागेसाठी उदयसिंग पाटील, हितेश पाटील, राजू रघुनाथ पाटील, डॉ.जगदीश पाटील व आसीफ खान हे पाच उमेदवार येथून इच्छुक आहेत.
चाचपणी करून अहवालाचे आदेश
जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे ही मागणी करण्यात आली. वेळोवेळी तालुका काँग्रेस शिष्टमंडळाने संबंधितांची भेट ही घेतली आहे. त्यांनी ही मतदार संघात चाचपणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची अशी माहिती यावेळी डॉ.पाटील यांनी दिली. प्रसंगी सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष आसीफ खान, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, मागास सेल अध्यक्ष डॉ.विष्णू रोटे, महिला अध्यक्ष मनीषा जावरे, तालुका उपाध्यक्ष राजू चौधरी, दादाराव पाटील, अतुल जावरे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.