किनगावात जुगारी पसार : दोघांविरुद्ध गुन्हा
यावल- तालुक्यातील किनगाव येथे सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली मात्र अंधाराचा फायदा घेत दोन संशयीत पसार झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश वाढे, हवालदार मुजफ्फर खान यांनी कारवाई केली. सट्टा बेटींग घेेतांना सुभाष श्रावण पाटील व लुकमान तडवी आढळले मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले. घटनास्थळावरून एक हजार 30 रुपये रोख व जुगाराची साधने जप्त करण्यात आली.