घरकुल घोटाळा : आरोपींच्या जामिनावर 26 ला सुनावणी !


जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यातील जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज करणार्‍या आरोपींच्या जामिनावर आता 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. आरोपींच्या जामिनावर यापूर्वी सोमवारी, 16 रोजी न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती के.के.सोनवणे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले होते व नंतर पुढची तारीख देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 28 जणांचा जामीन अर्ज आज न्यायालयाने दाखल करून घेतला असून पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.


कॉपी करू नका.