कोरोना आजारावर मात करण्यासाठी रेल्वेची जागरूकता मोहीम


भुसावळ : मध्य रेल्वे प्रशासनाने कोरोना आजारावर मात करण्यासाठी जागरूकता मोहिम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यामध्ये विविध घोषवाक्य असलेल्या भित्तिपत्रक, द्रुक-श्राव्य माध्यमातील स्लाईड्सचा समावेश आहे. यामध्ये लोकांना कोविड विषांणूपासून स्वतःचा बचावाबद्ल माहीती देणारे तसेच लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरण करून घ्या, मास्क परीधान करा, कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच स्वच्छता, औषधे आणि कठोर शिस्त या त्रिसूत्रीने होईल कोरोनावर मात अशी भित्तीपत्रके मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर व सोलापूर विभागातील विविध स्थानकांवर चिटकविण्यात/दर्शविण्यात आलेली आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !