सहा राज्यातून महाराष्ट्रातून येणार्यांना कोरोना चाचणी गरजेची
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर आणि उत्तराखंड राज्यांना कोरोनाचे अतिसंवेदनशील उगमस्थान घोषित केले आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रात येणार्यांना त्या आधी 48 तासांमध्ये केलेली आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा रिपोर्ट प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 45 हजार 654 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं तर गेल्या चोवीस तासांत 503 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.