तर वंचित बहुजन आघाडी व एमआयएम येणार पुन्हा एकत्र !


वंचितशी घटस्फोट घेणार्‍या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत

औरंगाबाद : वंचितशी घटस्फोट घेणार्‍या एमआयएमकडून पुन्हा मनोमिलनाचे संकेत दिले आहेत. वंचित आघाडी आणि एमआयएमची आघाडी होण्यासाठी आंबेडकरांनी ओवेसींना फोन करावा, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्याआधी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत घोषणा केली होती.
विधानसभेसाठी जागावाटपाचा तिढा न सुटल्याने एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं इम्तियाज जलील यांनी परीपत्रक जारी
करत म्हटलं होतं.

तर आघाडी शक्य !
विधानसभेच्या तोंडावर जागा वाटपावरुन वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी तुटल्याचं खासदार इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी यांनी स्पष्ट केलं होतं. पण पुन्हा ही आघाडी व्हावी, अशी इच्छा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे. वंचित आघाडी आणि एमआयएमची आघाडी कायम राहावी अशी इच्छा आहे. अजून सगळं संपलं नाही, आघाडी शक्य असल्याचं वक्तव्य करत जलील यांनी केले आहे.


कॉपी करू नका.