मास्क न लावणार्‍यांना आता रेल्वे स्थानकावरही दंड


शिवसेना तालुका संघटकांच्या मागणीला आले यश

भुसावळ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकावासाठी नागरीकांना नियम पाळण्यासह मास्क न लावणार्‍यांविरुद्ध पालिका प्रशासनाकडून धडक कारवाई केली जात होती मात्र भुसावळसारख्या रेल्वेच्या जंक्शन शहरात केवळ जनजागृती केली जात होती. रेल्वेला दंडाचे अधिकार द्यावेत अथवा पालिकेने रेल्वे स्थानकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून ट्रेनमध्ये किंवा रेल्वेच्या परीसरात विना मास्क वावरणार्‍या नागरीकांना आता पाचशे रुपये दंड केला जाणार आहे. रेल्वे बोर्डाकडून देशभरातील सर्व रेल्वे विभागांना एका परीपत्रकाद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेमंत्र्यांकडे केली होती तक्रार
रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते होते. अशा परीस्थितीत कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू शकतो. त्यात प्रवासी प्रवासादरम्यान तोंडाला मास्क लावत नव्हते, सोशल डिस्टन्सिंग व महत्त्वाच्या नियमांचे पालन करीत नाही अशी तक्रार रेल्वेमंत्री पियुष गोयल, महाव्यवस्थापक संजीव मित्तल, डीआरएम विवेक गुप्ता व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी केली होती.





उशिरा का असेना घेतला निर्णय
देशभर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक झाला असून कामानिमित्त इतर राज्यांत गेलेल्या नागरीकांची आपल्या गावी परतण्यासाठी झुंबड उडाली होती. यामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण पडला, औषधांचा आणि हॉस्पिटलमधील बेडचा तुटवडा निर्माण झाला. कोरोना रेल्वेच्या माध्यमातून गावागावात पोहचला आहे, रेल्वे प्रशासनाने उशीरा का असेना निर्णय घेतला, असे प्रा.धीरज पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !