मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकपदी संजीव मित्तल
भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या निवृत्तीनंतर रीक्त जागी संजीव मित्तल यांची नियुक्ती रेल्वे बोर्डाने केली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर, मुंबई, पुणे, भुसावळ आणि नागपूर या पाच विभागांचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असणार आहे. शर्मा यांच्या निवृत्तीनंतर वेस्टर्न रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मध्य रेल्वेच्या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. रेल्वे बोर्डाने 10 जीएम नियुक्तीचे आदेश गुरुवारी काढले.