सीबीआय तपासणीबाबत माजी गृहमंत्री देशमुख म्हणाले, तपासणीला पूर्ण सहकार्य


नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय पथकाबाबत माध्यमांनी विचारल्यानंतर अनिल देशमुख आपल्या निवासस्थानाबाहेर आले. सीबीआयची चमू सर्च करायला आपल्या निवासस्थानी आली होती. त्यांना आम्ही संपूर्ण सहकार्य केले. आता मी माझ्या मतदारसंघात कोविड रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे ते म्हणाले. शनिवारी सकाळी देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह अन्य ठिकाणांवरही सीबीआयची पथके पोहचली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानासमोर केंद्राच्या विरोधात तुफान घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !