शिवसेना भाजपासमोर नरमली : जे वाट्याला येईल त्यात समाधानी


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई मॅरेथॉन बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती असून आता शिवसेना 126 तर भाजपा 162 जागांवर निवडणुका लढणार असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी शिवसेना मंत्र्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविली असून तत्पूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये शिवसेना सचिव अनिल देसाई म्हणाले की, निवडणुकीपूर्वीची आढावा बैठक आहे ज्यात पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील. युतीबाबत नवीन फॉर्म्युला आला आहे तुम्ही आकड्यांमध्ये जाऊ नका, जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढायची आमची तयारी आहे. समाधानी असल्याशिवाय पक्षप्रमुख तसं काही करणार नाहीत, असं देसाई यांनी सांगितलं.


कॉपी करू नका.