कोरोना लसीकरणाच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार
नवी दिल्ली : 18 वर्षीय तरुणीवर कोविड व्हॅक्सीन देण्याच्या आमिषाने दोन तरुणांनी अत्याचार केल्याची घटना बिहारमधील पाटण्यात घडली. रॉकी व मंटू अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पीडीतेला जमुनापूर भागातील निर्जन घरात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेने विरोध केला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा नराधमांनी तिचे हात पाय बांधले आणि तोंडात रुमालही कोंबला. यानंतर या दोघांनीही पीडितेवर बलात्कार केला. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली.