ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदी बाळासाहेब पाटील


मुंबई : ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदी बाळासाहेब पाटील यांची बदली करण्यात आली तर सातारा आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक अनिल वडनेरे यांची नाशिक ग्रामीण पोलिस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली. शुक्रवारी याबाबतचे आदेश अपर पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले. दरम्यान, बाळासाहेब पाटील हे यापूर्वी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात पोलिस अधीक्षकपदावर कार्यरत होते. आता ते ठाणे शहर पोलिस उपायुक्तपदाचा पदभार पाहतील.


कॉपी करू नका.