प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांचे निधन


नवी दिल्ली : वृत्तवाहिन्यांमधला प्रसिद्ध चेहरा असलेले रोहित सरदाना यांचे शुक्रवारी निधन झाले. कोरोनावर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका झाला. झी न्यूजमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये कार्यरत होते. झी न्यूजमध्ये वरीष्ठ पदावर काम करत असलेल्या सुधीर चौधरींनी सरदाना यांच्या निधनाची माहिती ट्विट करून दिली. वरीष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीदेखील सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती, असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा विषाणू आमच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला आमच्यापासून हिरावून नेईल याची कल्पनादेखील केली नव्हती. यासाठी मी तयार नव्हतो. हा देवानं केलेला अन्याय आहे. ओम शांती,’ असं चौधरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !