भुसावळात एकाच दिवशी 110 किलो प्लॅस्टीक जप्त


दोघा दुकानदारांवर कारवाई : प्लॅस्टीक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे आवाहन

भुसावळ- प्लॅस्टीक कॅरीबॅगला बंदी असलीतरी शहरातील व्यापारी सर्रास कॅरीबॅग वापरत असल्याने शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या नेतृत्वात पथकाने शहरातील सातारा पुल, डेली मार्केट, संतोषभाऊ चौधरी म्युन्सीपल कॉम्प्लेक्स, डेलि मार्केट आदी परीसरातील 42 दुकानदारांना भेटी देत प्लॅस्टीक कॅरीबॅग वा थर्माकॉलचा वापर न करण्याचे आवाहन केले. पथकाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी प्लॅस्टीक साहित्य काढून दिल्याने तब्बल 110 किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले. यावेळी पथकाने केलेल्या तपासणीत हॉटेल रसोई समोरील शंकर प्रोव्हीजन या दुकानातून तसेच डेलि मार्केटमधील गणेश पान मसाला या दुकानात कॅरीबॅग आढळल्याने दोघा दुकानदारांना प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे दंड करण्यात आला.

पथकात यांचा सहभाग
मुख्याधिकारी करुणा डहाळे, उपमुख्याधिकारी सोमनाथ कोठुळे, आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील, नगर अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईते, सहा.लेखापाल विशाल पाटील, पाणीपुरवठा अभियंता नितीन लुंगे, शहर समन्वयक प्रदीप शिरसाठ, कर अधीक्षक महेंद्र कापोरे, कर अधीक्षक रामदास म्हस्के, स्वच्छता निरीक्षक प्रदीप पवार, वसंत राठोड, शिपाई किशोर जंगले, राजेंद्र चौधरी, पोपट संसारे, श्याम बाणाईत, कृष्णा पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली.


कॉपी करू नका.