भुसावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला नव्हे पीआरपीला


जगन सोनवणे यांचा दावा : खड्ड्यांचे केले पूजन

भुसावळ : भुसावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादीला नव्हे तर पीआरपीला सोडण्यात आली असल्याचा दावा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी करीत राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घुले यांना उमेदवारी मिळाल्यास आपण एक लाख 21 हजारांचे बक्षीस गरीब शेतकर्‍यांच्या कुटूंबांना देवू, असा दावाही त्यांनी येथे केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भीमालयात त्यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परीषद घेतली. यावेळी सोनवणे यांनी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यपद्धत्तीवर टिका केली.

जनआधारतर्फे निवडणूक लढवून दाखवा
सोनवणे म्हणाले की, माजी आमदार संतोष चौधरी यांनी सतीश घुले यांना उमेदवारी जाहीर करून पक्षश्रेष्ठींसह सर्वांचा अपमान केला आहे. चौधरींजवळ आज कार्यकर्ते नसून केवळ तीन नगरसेवक सोबत आहेत. जनआधारतर्फे विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहनही त्यांनी माजी आमदारांना केले. भुसावळ विधानसभेची जागा शरद पवार व अजित पवार यांनी मित्र पक्षाच्या बैठकीत पीआरपीला सोडली असल्याचा दावा सोनवणे यांनी करीत मुंबईच्या बैठकीत जोगेंद्र कवाडेंसह आपण स्वत: उपस्थित असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या सात मतदाससंघामध्ये रीपब्लिकन जनशक्ती मेळाव्याचे अयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रसंगी पंचायत समिती माजी सदस्या पुष्पा सोनवणे उपस्थित होत्या.

खड्ड्यांचे केले पूजन
प्रसंगी जगन सोनवणे व त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणे यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे पूजन करून आगळे-वेगळे आंदोलन करीत नागरीकांचे लक्ष वेधले.


कॉपी करू नका.