बॅनर, झेंडे हटविण्यासाठी राजकिय पक्षांना नोटीस


भुसावळ : आदर्श आचारसंहिता जाहिर झाल्याने पालिकेने आता शहरातील सर्व राजकिय पक्षांच्या शहराध्यक्षांना सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, राजकिय पक्षांचे झेंडे काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. 24 तासांच्या आत बॅनर काढावे, अन्यथा आदर्श आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाकडून रविवारी शहरातील बॅनर काढण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालिकेने बजावली नोटीस
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पालिकेने शहरातील सर्व राजकिय पक्षांच्या शहराध्यक्ष तसेच प्रमुखांना शहरात आपल्या पक्षांच्या माध्यमातून लावण्यात आलेले बॅनर तसेच झेंडे काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान यासंदर्भात शनिवारी बैठक होऊन रविवारपासून थेट कारवाई सुरु केली जाणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्त्यांवरील विजेचे खांब, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर काढून जप्त करण्याची कारवाई होईल. तसेच पालिकेसह अन्य विभागांच्या संकेतस्थळावर असलेले लोकप्रतिनिधींचे फोटोही काढण्यात येणार आहेत. यादृष्टीने आता पालिकेने पूढील कारवाई सुरु केली आहे. शहरात कोठेही राजकिय पक्षांचा प्रचार करणारे बॅनर आदर्श आचारसंहिता काळात आढळून आल्यास सबंधीतांवर तसेच होर्डींगची मालकी असलेल्या जाहिरात एजन्सीवरही कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच विविध विकासकामांचे फलक, हायमस्टवर लावण्यात आलेले राजकिय पक्षांची चिन्हे व नावे कागद किंवा कपड्याने झाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


कॉपी करू नका.