मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील सभा रद्द


माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर निर्णय

भुसावळ- माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्ह्यातील तीनही सभा रद्द झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. महाजनादेश यात्रा बुधवारी सायंकाळी सहा वाजता घाणखेड, ता.बोदवड येथे आल्यानंतर बोदवड येथे यात्रेचे जल्लोषात स्वागत केले जाणार होते तर जामनेर येथे 8 रोजी सकाळी 11 वाजता सभा झाल्यानंतर भुसावळात 12 वाजता तर जळगावात एक वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार होती मात्र स्वराज यांच्या निधनाने या सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चौथ्यांदा भुसावळकरांची निराशा
यापूर्वी भुसावळात अटल योजनेसह दीपनगरातील नवीन प्रकल्पाच्या तसेच बहिणाबाई महोत्सवाच्या शुभारंभाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला तर बुधवारीदेखील त्यांची जाहीर सभा असल्याने भाजपा पदाधिकार्‍यांसह शहरवासीयांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती मात्र माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने सभा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, महाजनादेश यात्रा रद्द झाली वा ती पुढे धुळे जिल्ह्यात नेण्यात येत आहे वा नाही? याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.


कॉपी करू नका.