भुसावळात जिल्हा धान्य व्यापार्यांची सभा उत्साहात

नूतन कार्यकारीणीचे गठण : व्यापारातील अडचणींवर काढणार तोडगा
भुसावळ- शहरातील संतोषी माता हॉलमध्ये जिल्ह्यातील 17 तालुक्यांच्या 350 व्यापारी प्रतिनिधींची सभा झाली. सभेमध्ये प्रत्येक मार्केट कमिटी मधील व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. या सभेत रोजच्या व्यापारात येणार्या अडचणींवर समाधान काढण्यासाठी प्रयत्न चर्चा करण्यात आलीतसेच याप्रसंगी जिल्हा सभेची नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. कार्यकारणीच्या नवीन अध्यक्षपदी राधेश्याम लाहोटी यांची निवड करण्यात आली. वर्तमान अध्यक्ष भरत शेंडे यांनी लाहोटी यांच्याकडे पदभार सोपवला. भुसावळ आडत व व्यापारी असोसिएशनने उत्कृष्टरीत्या सभेचे आयोजन केल्याने जिल्हाभरातील व्यापार्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र लढा, मधुसूदन हेडा, नरेंद्र अग्रवाल, नितीन सुराणा, राजेश लढा, नगीनचंद कोटेचा तसेच भुसावळातील सर्व व्यापार्यांनी परीश्रम घेतले.




