भुसावळातील तीन लाख सात हजार मतदार बजावणार हक्क

विधानसभा निवडणूक : 307 मतदान केंद्रे
भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीत तीन लाख सात हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी विविध पथकांची नेमणूक करण्यात आली. सिंगल विंडो पथक विविध परवानग्या देण्यासाठी, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओ सर्व्हेक्षण पथक, 35 झोन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक झोनवर एक झोनल अधिकार्याची नेमणूक करण्यात आली आहे तसेच 307 मूळ मतदान केंद्रे असून पाच सहाय्यक मतदान केंद्रे स्थापन केली गेली आहे. दरम्यान, मध्यवर्ती आचारसहिंता पथकही स्थापन करण्यात आले असल्याचे तहसीलदार दीपक ढिवरे म्हणाले.
