फैजपूर मसाका चेअरमन शरद महाजन यांचा भाजपात प्रवेश
महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्रसिंग यादव यांच्या उपस्थितीत नऊ संचालकांनी केला प्रवेश
फैजपूर- माजी गृहराज्यमंत्री जे.टी.महाजन यांचे पूत्र मसाका चेअरमन तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन यांनी मंगळवारी धुळ्यात महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्रसिंग यादव यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मंगळवारी धुळे येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. प्रसंगी मसाका चेअरमन शरद महाजन यांच्यासह मसाकाच्या नऊ संचालकांनी भाजपात प्रवेश केला.
यांनी केला भाजपात प्रवेश
माजी गृहराज्यमंत्री जे.टी.महाजन यांचे सुपुत्र काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, मिलिंद नेहेते, निर्मला महाजन, शालिनी महाजन, सुरेश माधवराव पाटील, संजय चुडामण पाटील, माधुरी प्रमोद झोपे, युवराज सरोदे, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, यावल नगरसेवक गिरीष महाजन ,न्हावीचे सरपंच भारती चौधरी, उपसरपंच सतीश जंगले, सांगवी सरपंच भालचंद्र भंगाळे व उपसरपंच विकास धांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद महाजन, उमेश बेंडाळे यासह न्हावी येथील दूध उत्पादक संस्था, विकास सोसायटी, जे टी महाजन फ्रुट सोसायटी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य, माजी सरपंच यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्रसिंग यादव, नामदार हरीभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल आदी उपस्थित होते.