संतापजनक : लग्न वरातीत आलेल्या नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
जहानाबाद : लग्न वरातीत आलेल्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना जहानाबाद जिल्ह्यातील शकुराबाद पोलिस स्टेशन परीसरात शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर पलंगाखाली लपलेल्या नराधम आरोपीला ग्रामस्थांनी चांगलेच चोपले व पोलिसांच्या स्वाधीन करताच त्यास अटक करण्यात आली.
घरी कुणी नसताना अत्याचार
जहानाबाद जिल्ह्यातील एका गावात लग्न असल्याने वरातीसोबत एक तरुण आला असता पीडीतेच्या घरात आरोपी शिरला व त्याने अत्याचार केला व त्याचवेळी पीडीते विरोध करीत आरडा-ओरड करीत असताना पुढच्या खोलीत झोपलेला भाऊ जागा झाला व ग्रामस्थही जमले. त्याचवेळी आरोपी पलंगाखाली लपला. बाहेर काढल्यानंतर त्याला चांगलेच चोपण्यात आले व त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. एसएसपी हरीशंकर कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या जबाबावरून आरोपीविरूद्ध महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी केली जात असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अधिक स्पष्ट सांगता येईल.



