धक्कादायक ! : शारीरीक संबंधास नकार ; पत्नीची गोळी झाडून हत्या ; मुलांनाही फेकले कालव्यात


मुझफ्फरनगर : पत्नीनं शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या पत्नीनं पत्नीवर गोळी झाडून हत्या केली तर तीन मुलांना कालव्यात फेकले.मुझफ्फरनगरमधील बसेडी गावात ही घटना घडली. मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही. पत्नीचा खून करणार्‍या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पत्नी 15 दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत होती. सकाळी तिनं न ऐकल्यास तिची हत्या करायची, असा निश्चय आदल्या रात्रीच केला होता आणि तेच झालं. पत्नीची हत्या केल्यानंतर पती मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांचं पालनपोषण कोण करणार, या विचारानं त्यानं मुलांना कालव्यात फेकून दिलं. सानिया, वंश आणि हर्षिता अशी या मुलांची नावं आहेत. यापैकी हर्षिता केवळ 15 महिन्यांची आहे. अटकेतील आरोपीचे नाव पप्पू असे असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !