p>

विधानसभा निवडणुकीसोबतच आता सातार्‍यात लोकसभेची पोटनिवडणूक


नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरीयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेसह, विविध राज्यांमधील 64 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या. मात्र सातारार्‍याच्या पोटनिवडणुकीची आयोगाने घोषणा केली नव्हती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि उदयनराजे भोसले यांची चिंता काहीशी वाढली होती. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकांसोबतच सातारा पोटनिवडणुकीचे 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरलाच मतमोजणी होणार आहे. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.


कॉपी करू नका.