मोठी बातमी : सीबीएसई बारावी परीक्षा रद्द
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची बारावी सीबीएसईची 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी मंगळवारी सायंकाळी राज्ये आणि अन्य वरीष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह उपस्थित होते. दरम्यान, बारावीची परीक्षा रद्द केल्याचे आता सर्वोच्च न्यायालयाला 3 जूनला कळविण्यात येणार आहे.