मित्रासोबत बाहेर पडलेल्या तरुणीवर अत्यावार
नवी दिल्ली : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीत घडली. तरुणीचे अपहर करून आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
चाकूचा धाकावर अपहरण करीत केला अत्याचार
पीडीतेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी त्याच्या बहिणीसह तिचे दोन मित्र अर्णव आणि सागर बाहेर फिरायला गेले इज्जतनगर परीसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मित्रांना थांबवत त्यांना मारहाण करण्यात आली. चाकूचा धाक दाखवत बहिणीचे अपहरण केलं. यानंतर एका अज्ञातस्थळी नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शनिवारी पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितल्यानंतर घटना उघडकीस आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.



