प्रेम संबंधात अडथळा ठरणार्या पतीचा खून : पत्नीसह प्रियकराला बेड्या
पुणे : पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अश्विनी मनोहर हांडे (19, रा.उरळी देवाची) व गौरव संतोष सुतार (वय 19, रा. फुरसुंगी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर मनोहर हांडे (27, रा़ उरुळी देवाची) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. आरोपींमध्ये लग्नापूर्वी संबंध होते व सुरू ठेवण्यासाठी पती अडथळा ठरत असल्याने पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या व नंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
उरुळी कांचन येथे मनोहर हांडे यांचा 24 मे रेाजी मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना संशयास्पद मृत्यू झाल्याचा संशय झाल्यानंतर खोलवर तपासात अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी गौरवला ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने अश्विनीच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन बाबासाहेब निंबाळकर यांनी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली आहे.



