संतापजनक ! : वाढदिवसाला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार


मुंबई : मित्राच्या वाढदिवसाला गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर सात मित्रांनी बलात्कार केला. मुंबईतील मालवणी भागात 31 मे रोजी ही घटना घडली. पोलिसांनी सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली असून सर्व 18 ते 23 वयोगटातील आहेत. पीडीतेच्या इन्स्टाग्रामवरील एका मित्राच्या वाढदिवसाला तरुणी घरच्यांना न सांगता मालवणीत गेली. त्यानंतर तिच्यावर हा प्रसंग ओढवला. दरम्यान, 1 जूनला पीडिता घरी आल्यानंतर तिने पोटात दुखत असल्याचे सांगताच आईने कारण विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. डीसीपी चैतन्य एस.यांनी शुक्रवारी रात्री या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केल्याची माहिती दिली.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !