हतनूरला राज्य राखीव पोलीस बल गट स्थापन करण्यास राज्य मंत्री मंडळाची मंजूरी
1384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता ; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
जळगाव- भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे राज्य राखीव दलाच्या पोलिस बल गट क्रमांक 19 ची स्थापना करण्यास पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नाने राज्य मंत्री मंडळाने बुधवारी मान्यता दिली. सुरुवातीला एक हजार 384 पदांची निर्मिती करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट निर्मितीसाठी अपेक्षित असलेल्या सुमारे एकूण 56.61 कोटी आवर्ती व 81.01 कोटी अनावर्ती खर्च मंजूर करण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 च्या निर्मिती करीता विविध संवर्गातील एकूण 1384 पदे मंजूर करण्यात आली आहेत.
या पदांना मिळाली मान्यता
प्रामुख्याने कार्यकारी पदांमध्ये प्राचार्य- 1, सहाय्यक पोलीस उप अधीक्षक- 7, सहाय्यक समादेशक- 3, पोलीस निरीक्षक- 9, पोलीस उपनिरीक्षक -23, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 80, पोलीस हवालदार- 160, पोलीस शिपाई 854 अशी एकूण एक हजार 173 पदे मंजूर करण्यात आली आहे. तर मोटार परीवहन विभागामध्ये एकूण 30 पदांना मान्यता देण्यात आली तर बिनतारी संदेश विभागामध्ये एकूण 68 पदांना मान्यता देण्यात आली.