विवाहितेवर शेजार्यानेच केला अत्याचार : आरोपीला अटक
नवी दिल्ली : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून शेजारी राहणार्या एका इसमाने घरात प्रवेश करीत विवाहितेवर अत्याचार केला. उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर (नोएडा)च्या फेज-2 भंगेल परीसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. रात्री उशिरा पती घरी येणार असल्याने महिलेने दरवाजा उघडा ठेवला मात्र आरोपीने घराच्या छतावरून प्रवेश करीत दृष्कृत्य केले.