गावठी कट्ट्यांची तस्करी करणारा संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात


गावठी कट्ट्यासह एक जिवंत काडतुस पोलिसांनी केले जप्त

जळगाव : शस्त्र विक्रीसाठी तस्कर गावठी कट्ट्यासह येणार असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने चोपडा ग्रामीण हद्दीत सापळा लावून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 26 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. प्रतापसिंग उनासिंग खिच्छी (48, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवाणी मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, दीपक शिंदे, परेश महाजन, उमेश गोसावी आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.