शनी अमावस्येला न्यायडोंगरीसह पिंपरखेडला पॅसेंजरला थांबा


प्रवाशांच्या सोयीसाठी अप-डाऊन मुंबई व अप-डाऊन देवळाली शटल थांबणार

भुसावळ : चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरसह पिंपरखेड रेल्वेस्थानकावर शनि अमावस्येनिमित्त शनिवार, 28 सप्टेंबर रोजी भाविक रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अप-डाऊन मुंबई व अप-डाऊन देवळाली शटलला एका दिवसासाठी थांबा देण्यात आला आहे. न्यायडोंगरी येथे दर्शनासाठी खान्देशातून मोठ्या प्रमाणावर येतात त्यामुळे अप 51154 व डाऊन 51153 भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह अप 51182 व डाऊन 51181 डाऊन भुसावळ-देवळाली व देवळाली-भुसावळ या पॅसेंजर गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा उपयोग घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


कॉपी करू नका.