रेल्वेच्या विशेष मोहिमेत 85 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई


भुसावळ- धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृतरीत्या खाद्य पदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध 27 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत एकूण 85 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे. खान-पान निरीक्षक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, मुख्य टिकिट निरीक्षक तसेच रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत ही मोहिम राबवण्यात आली तर यानंतरही रेल्वे सुरक्षा बलाकडून अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.