भुसावळात उद्या काँग्रेस जिल्हा अल्पसंख्यांक विभागाची बैठक
भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरणार !
भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीती रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस जिल्हा अल्पसंख्यांक विभागाची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी दुपारी दोन वाजता शहरातील विमल भवन, प्लॉट नं.10, लक्ष्मी नगर, जामनेर रोड येथे होत आहेत. अध्यक्षस्थानी माजी आमदार नीळकंठ फालक असतील. याप्रसंगी भुसावळ विधानसभेचे काँग्रेसचे इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष , शहरध्यक्ष, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी केले असल्याचे उत्तर महाराष्ट्र सचिव अ.हमीद अ.वाहेद कळवतात.