भुसावळात राष्ट्रवादीची निदर्शने : खासदार शरद पवारांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने भाजपा सरकारचा निषेध
भुसावळ- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात कुठलाही संबंध नसताना भाजपा सरकारने दबाव तंत्राचा वापर करून गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरात निदर्शने करीत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले.
तहसील कार्यालयात प्रांतांना दिले निवेदन
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते गुरुवारी सकाळी अष्टभुजा देवी मंदिराजवळ जमले व त्यांनी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन दिले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना तरुणांचा मिळत असलेला पाठिंबा पाहता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यानेच ईडीमार्फत गुन्हा दाखल करणयात आल्याचा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या बाबीचा निषेध करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. प्रसंगी तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी निदर्शने केली.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, तालुकाध्यक्ष सतीश घुले, दीपक मराठे, शहराध्यक्ष नितीन धांडे, भुसावळ पालिका गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय समाधान अवसरमल, भगवान धांडे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, मुन्ना सोनवणे, शोएब खान, नाजीम कादरी, रवींद्र चौधरी, बाळू गोलांडे, दिनकर राऊत, अमजद खान, मयुरी पाटील, शारदा कोळी, भूरासिंग चितोडीया, विश्वास चौधरी, अशोक पाटील, सुरजसिंग चितोडीया, राजकुमार चितोडीया, राहुल बोरसे, महेंद्रसिंग चितोडीया यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.