जळगावात ट्रकमध्ये चालणार्‍या जुगाराचा डाव उधळला : आठ जुगारी जाळ्यात


नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त : जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून सुमारे 600 मीटर अंतरावर के.के.कॅन्स कंपनीसमोर एका ट्रकमध्ये बसून आठ तरुण जुगार खेळत असताना एमआयडीसी पोलिसांनीर बुधवारी दुपारी छापा मारुन कारवाई केली. यात ट्रकसह आठ लाख 99 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या आरोपींना अटक
सिकंदर हकीम पटेल (वय 30, रा. पोलीस कॉलनी), लखन रामदास पवार (वय 30, रा. कुसुंबा), सलमान गुलामनबी चौधरी वय 29, रा. संतोषी माता चौक, मेहरुण), शरद श्रावण सोनवणे (वय 39, रा. रामेश्वर कॉलनी), हेमंत मुकुंदराव पाटील (वय 41, रा.ज्ञानदेवनगर, गीताईनगर), शहाबुद्यीन शेख सलीमोद्यीन (वय 37, रा.पोलीस कॉलनी), मोहम्मद हनीफ गुलाम मुर्तुजा (वय 73, रा.सदाशीव कॉलनी, दत्तनगर), गोपाळ गोविंदा सोनवणे (वय 33, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. हे सर्व जुगारी के.के.कॅन्स कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये (एमएच 01 एल 2403) जुगार खेळत होते. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, विशाल सोनवणे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांच्या पथकाने छापा मारला. जुगार खेळणार्‍यांकडून पत्ता-जुगाराची साधने, रोख रक्कम, मोबईल तसेच ट्रक असा एकूण आठ लाख 99 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


कॉपी करू नका.