भुसावळच्या प्राचार्य नीना कटकर यांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान


भुसावळ : ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर व चित्रकला शिक्षक हर्षानंद सोनवणे यांना राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्काराने मुुंबईत गौरवण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय ज्ञानपीठद्वारा आयोजित पुरस्कार सन्मान सोहळ्यात अंधेरी पूर्व, मुंबई येथील हॉटेल कोहिनूर कँटीनेंटल येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षा सन्मान कार्यक्रमात माजी चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अ‍ॅकॅडमीचे माजी अध्यक्ष डॉ.दामोदर खडसे, औरंगाबादचे सह धर्मदाय आयुक्त शरद वाळके, निर्माता, दिग्दर्शक, मास्टर विनायक फिल्मस मुंबईचे जयप्रकाश कर्नाटकी, हिंदी सिनेमा गायक घनश्याम वासवानी, हिंदी, मराठी चित्रपट नायीका जयश्री, हिंदी, मराठी चित्रपट नायक प्रदीप वेलनकर, कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या संगीता चाक्को, व्यापारी व सामाजिक कार्यकर्ता परभणी राजेंद्र मगर, मयुरी शुभानंद नायिका, मॉडेल व फॅशन डिझायनर मयुरी शुभानंद, इंदिरा गांधी ट्रस्टचे संचालक जी.एस.राहणे या प्रमुख पाहुण्यांच्या गौरवण्यात आले. दरम्यान पुरस्कार मिळाल्याने उभयंतांचे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक,सचिव विष्णु चौधरी यांच्यासह ताप्ती पब्लिक स्कूलचमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांकडून कौतुक होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !