जगातील सर्वाधिक स्वस्तातील फोन गणेश चतुर्थीला होणार लाँच


गुगल व जिओ टीमने बनवला ‘जिओ फोन नेक्स्ट’ : मुकेश अंबानींची घोषणा

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांसाठी दिलादादायक बातमी आहे. गुगल आणि जिओ टीमने ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन विकसीत केला असून 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा रीलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी 44 व्या वार्षिक बैठकीत केली. संपूर्ण फिचर असलेला या स्मार्ट फोनमध्ये वापरकर्ते गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रीलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86 हजार 493 कोटी रुपये इतका आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !