मुथ्थूट फायनान्सवरील दरोडा टळला : दरोडेखोर जाळ्यात
उल्हासनगर : मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकण्यापूर्वीच सात दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर आदी साहित्य जप्त करण्यात आले. कॅम्प नं.4 लालचक्की परीसरातील मुथ्थूट फायनान्स कार्यालयात संशयीत दरोडा टाकण्याच्या तयारीत होते मात्र संशयास्पद हालचालीनंतर हा प्रकार हाणून पाडण्यात आला.
संशयास्पद हालचालीवरून कारवाई
मुथूट फायनान्स शेजारील गाळा (दुकान) काही जणांनी भाड्याने घेऊन त्याजागी फळांचा व्यवसाय सुरू केला. दुकानाची व मुथुट फायनान्स कार्यालयाची एक भिंत सामाहिक आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्यानंतर फळांच्या दुकानात काही जणांच्या संशयास्पद हालचाली होत होत्या. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग करणारी गाडी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी जहीर अहमद, इमामुद्दीन कासीम शेख, जिजाऊ शेख, रामसिंग, काळू शेख, आदिम शेख अश्या सात जणांना अटक केली. सर्व दरोडेखोर झारखंड, यूपी व नेपाळ येथील असून त्यांच्याकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर, ऑक्सिजन गॅस सिलेंडर, हातोडे आदी साहित्य जप्त करण्यात आले. देशाच्या विविध पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



