देशातील ऑर्डनन्स कर्मचारी 26 जुलैपासून संपावर
भुसावळ : संरक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यताप्राप्त तीन्ही फेडरेशनसमवेत सीडरा जेडब्ल्यू एम असोसिएशन व ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकत्ता असोशियनची संयुक्त बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी झाली. या बैठकीत आयुध निर्माणीचे निगमीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा निर्णय झाला. 26 जुलै 2021 पासून अनिश्चित कालीन संपावर जाण्याचे ठरले व या संपासाठी अधिकृत नोटीस ही 8 जुलै 2021 रोजी सरकारला देण्यात येईल, अशी माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र झा यांनी दूरध्वनीद्वारे दिल्याचे दिनेश राजगिरे यांनी कळवले आहे.