शिवस्वराज्य यात्रा 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात
शुक्रवारी चाळीसगाव महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा
चाळीसगाव- राज्यात रयतेचे राज्य येण्यासाठी शिवनेरी ते रायगड दरम्यान 6 ऑगस्टपासून निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रा शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. पारोळा, धरणगाव, पाचोरामार्गे सायंकाळी सहा वाजता ही यात्रा चाळीसगावात दाखल होत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता चाळीसगावच्या राष्ट्रीय महाविद्यालयात खासदार उदयनराजे भोसले, खासदार डॉ.अमोल कोल्हे, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे, छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा होणार आहे. शेतकरी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे पत्रकार परीषदेत करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, शशिकांत साळुंखे, सुरेश चौधरी, प्रमोद पाटील, भगवान राजपूत, दिनेश पाटील, ,रामचंद्र जाधव, अजय पाटील, विष्णू चकोर, सुर्यकांत ठाकुर, मिलिंद शेलार व कार्यकर्ते उपस्थित होते.