विटनेरमध्ये गळफास घेतलेल्या तरुणाचा उरला केवळ सांगाडा

जळगाव : तालुक्यातील विटनेरच्या 25 वर्षीय तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळल्याने झाडावर केवळ सांगाडाच शिल्लक असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली. बद्री जनकू बारेला (वय 25, रा. बायखेडा, पो. झिरन्या, जि. खरगोन) असे मृत तरुणाचे नाव आहे. 8 सप्टेंबर रोजी बद्री बाहेर जाऊन येतो, असे सांगून बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र तो आढळला नाही. बद्रीच्या पत्नीने याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. शुक्रवारी सकाळी 11.15 वाजता विटनेर शिवारातील उत्तर बाजून भवानी मंदिराजवळील जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखीचा मृतदेह आढळला. मृताच्या अंगावरील मांस झडून गेल्याने केवळ सांगाडाच शिल्लक राहिला असलातरी अंगातील पिवळ्या रंगाचा शर्ट व बुटांवरुन तो मृतदेह बद्री याचा असल्याचे स्पष्ट झाले.




