भुसावळात अखेर पाणीपुरवठा सुरळीत


भुसावळ- पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर दुरुस्त न झाल्याने अखेर भाडे तत्वारील ट्रान्सफार्मर लावून शुक्रवारी दुपारी दोन वाजता शहरातील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. नागरीकांना रोटेशननुसार पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जुना ट्रान्सफार्मर दुरुस्त झाल्यानंतर भाडेपट्टीवरील ट्रान्सफार्मर काढण्यात येणार आहे

दुसर्‍यांदा कृत्रिम टंचाई
शहरातील पाणीपुरवठा येाजनेवरील जलशुध्दीकरण केंद्रातील 500 केव्हीएचा ट्रान्सफार्मर 14 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान बंद झाल्यानंतर सुमारे तीन दिवस पाण्यासाठी नागरीकांची भटकंती झाली तर मंगळवारी पुन्हा ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा लांबवला. शुक्रवारी सकाळपर्यंतही ट्रान्सफार्मर दुरुस्त होवू न शकल्याने अखेर जळगाव येथून भाड कराराने ट्रान्सफार्मर बसविल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होऊन शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा दुपारी दोन वाजता कार्यान्वित करण्यात आली. तीन ते चार दिवसांत पाणीपुरवठा आता सुरळीत होण्याची आशा आहे.


कॉपी करू नका.